कराड तालुक्यात भीषण स्फोट; १० किमी परिसर हादरला

  



कराड,दि.३०-: तालुक्यातील तासवडे येथील एमआयडीसी परिसरात सोमवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की तब्बल १० किलोमीटर परिसर हादरला असून अनेक ठिकाणी इमारतींच्या काचा फुटल्याची माहिती समोर येत आहे.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज अत्यंत भीषण होता आणि काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण पसरले. स्फोटानंतर आकाशात धुराचे मोठे लोट दिसून आले, ज्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार केमिकल प्रक्रियेदरम्यान काहीतरी बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


या दुर्घटनेत जखमी किंवा जीवितहानीबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नसून प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे.


स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या