गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फलटण पोलिसांची मोठी कारवाई; ४३ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई, १४७० जणांना नोटिसा;

 


फलटण : [प्रतिनिधी] दिनांक 21 सप्टेंबर 2029,

 गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून पार पाडण्यासाठी फलटण शहर पोलिस ठाण्याच्या वतीने प्रतिबंधात्मक कारवाईला वेग देण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण ४३ जणांवर तडीपारीची कारवाई केली असल्याची माहिती प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.

आगामी गणेशोत्सव तसेच इतर उत्सव काळात यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींकडून पुन्हा गैरकृत्य घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. त्याअंतर्गत फलटण शहर, मलटण, रविवार पेठ, कसबा पेठ, कुरेशीनगर, महत्पुरापेठ, शेलारवस्ती ठाकूरकी आदी परिसरातील संबंधित व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

तडीपार करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे:

विठ्ठल पांडुरंग माळी, देवीदास बापू माळी, संपत भरत माळी, अजय पांडुरंग माळी, रंगराव भरत माळी, अमर रामू माळी, नेताजी प्रकाश माळी, प्रकाश काळूराम माळी, अमोल आकाराम मोरे, रमेश संजय माळी, अजय रघुनाथ माळी (सर्व रा. सगुणामाता नगर, मलठण, फलटण); करण संजय सरगर, रोहन महेश सरगर, मंगेश किसन बेंद्रे (रा. खाटीक गल्ली, फलटण); किशोर धनराज पवार, धनराज लक्ष्मण पवार (रा. कसबा पेठ, फलटण); अमित अनिल कदम, राहुल बजरंग पोतेकर, सूरज हिंदूराव कदम, बजरंग राजेंद्र खलाटे, हेमंत दत्तात्रय शिरतोडे (सर्व रा. रविवार पेठ, फलटण); वरद विद्याधर मोहिते, प्रविण तुळशीराम नावळे (रा. जाधवांची फलटण); किरण कुमार घोरपडे (रा. ढवळ, फलटण); अजय संभाजी भोसले (रा. शेलारवाडी, ठाकूरकी); अभिजित जयवंत खराडे, सचिन जयवंत खराडे (रा. पवार गल्ली, फलटण); महेश विलास आपारे (रा. मंगळवार पेठ, फलटण); शिवाजी जगन्नाथ डोईफोडे (रा. नवामळा, ठाकूरकी); बिलाल रफिक कुरेशी, झिशान उर्फ दिशान इमाम बेपारी उर्फ कुरेशी, आबू उर्फ अल्ताफ अवसर कुरेशी, मुबारक हनिफ कुरेशी, शाहरूख जलील कुरेशी, अजिम शब्बीर कुरेशी (सर्व रा. कुरेशी नगर, फलटण); शंकर रामराव जुवेकर आणि अजय संजय जाधव (रा. मंगळवार पेठ, फलटण).  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३(२) अन्वये संबंधित व्यक्तींना मनाई आदेश बजावण्यात आले आहेत. तसेच BNSS अंतर्गत नोटिसा बजावणे, तडीपारीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविणे, प्रतिबंधात्मक कारवाई, वाहनचालकांविरुद्ध खटले दाखल करणे आदी कारवायाही करण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शांतता समिती, पोलीस मित्र आणि पोलीस-नागरिक समन्वय बैठका तसेच इतर विभागांच्या समन्वय बैठका घेतल्या आहेत. या बैठकींमध्ये गणेश मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिकांना उत्सव काळात शांतता व सलोखा राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी केली असल्याचे पोलिसांनी कळविले आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी फलटण पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या