शेटफळमध्ये मातंग-बौद्ध वस्तीवर सशस्त्र हल्ला; गावात तणावाचे वातावरण

हल्लेखोरांवर कारवाईची मागणी; वंचित समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर



मोहोळ,दि.२४- तालुक्यातील मौजे शेटफळ येथे मातंग व बौद्ध वस्तीवर सशस्त्र हल्ला झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.


स्थानिकांच्या आरोपानुसार, धनदांडग्या व्यक्तींकडून वस्तीतील नागरिकांवर शस्त्रांचा वापर करून हल्ला करण्यात आला.घरातील जिवणावश्शक वस्तूंचे नुकसान करण्यात आले . घरातील भांडी बाहेर फेकली  नेमके किती जण जखमी झाले, हल्ल्यामागील कारण काय आणि हल्ल्यात कोणत्या प्रकारची शस्त्रे वापरण्यात आली, याबाबत अधिकृत तपशील स्पष्ट होणे बाकी आहे.



घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून संबंधितांकडून माहिती घेणे अपेक्षित आहे. हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच वस्तीतील नागरिकांना संरक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.


या घटनेमुळे वंचित समाजाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, याकडे शेटफळ ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या