पणदरे (प्रतिनिधी),दि.२३-: दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठी माराच्या निषेधार्थ पणदरे गावात बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी, युवक, शेतकरी, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. देशभरात या घटने विरोधात संताप व्यक्त होत असून विविध ठिकाणी आंदोलनांची लाट उसळली आहे.
बंद दरम्यान गावातील अनेक दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. असून आंदोलनकर्त्यांनी र्विद्यार्थ्यां वर झालेल्या कथित कारवाईचा निषेध करत घोषणाबाजी केली. "विद्यार्थ्यांना न्याय द्या", "लोकशाहीतील आवाज दडपणे बंद करा" अशा घोषणा देण्यात आल्या.आंदोलनकर्त्यांनी म्हटले की,
विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले असताना त्यांच्यावर बलप्रयोग होणे अत्यंत दुर्दैवी आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांवरील कारवाईचीही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
पोलीस व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित सरपंच अजित सोनवणे, दत्तात्रय जावळे, विशाल घोरपडे, प्रविण कोकरे,शंकर कोकरे,महेश गायकवाड,, प्रमोद कोकरे,विश्वास जगताप, धैर्यशील कोकरे, सचिन बगाडे, अरुण मोरे, संदीप कांबळे,समीर गायकवाड ,
संग्राम सोनवणे, किरण कोकरे,गोरख,खोमने, दिलीप खोमणे, पप्पू खोमणे, सागर खोमणे,बाळा जाधव व इतर सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले असून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.





0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज