मुंबई | प्रतिनिधी,दि.२२- : दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद पाळण्याचे आवाहन केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला लाठीहल्ला हा निषेधार्ह असून, संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व आंदोलनाच्या अधिकारावर हा आघात आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिक, सामाजिक संघटना, व्यापारी, कामगार, विद्यार्थी आणि विविध घटकांनी शांततेच्या मार्गाने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या बंददरम्यान राज्यभरात निषेध मोर्चे, धरणे आंदोलने आणि निवेदने देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच सर्वांनी कायदा व सुव्यवस्था राखून, शांततापूर्ण पद्धतीने आंदोलनात सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज