SC/ST अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळा; विशाल लोंढे यांचे मार्गदर्शन


प्रतिनिधी:

मुंबई/पुणे ,दि.३-: नागरी हक्क संरक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती आणि गुणवत्तापूर्ण तपास या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.


या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून विशाल लोंढे उपस्थित होते. त्यांनी SC/ST अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेली कार्यपद्धती, तपास प्रक्रियेत पारदर्शकता व गुणवत्तापूर्ण तपासाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.



यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायद्याच्या विविध तरतुदी, न्यायालयीन प्रक्रियेमधील महत्त्वाचे मुद्दे तसेच पीडितांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने घ्यावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. कायद्याविषयी जनजागृती वाढविणे, तक्रारींचे तातडीने निवारण करणे आणि तपास प्रक्रियेत संवेदनशीलता राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


कार्यशाळेत सहभागी अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित घटकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. SC/ST अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरत असून सामाजिक न्याय व समानतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या