प्रतिनिधी : संजय मोरे
फलटण, दि. ४ -:फलटण उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे विविध रिक्षा संघटनांच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खेडे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या टीमच्या आगमनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात रिक्षा चालक व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्वागत समारंभात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक धनराज दाभाडे यांचा सत्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिनेश अहिवळे यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गीतांजली काळे यांचे स्वागत संघटनेचे सदस्य उमेश अहिवळे यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना धनराज दाभाडे यांनी फलटण तालुक्यातील सर्व रिक्षा चालकांनी मराठी भाषेचा वापर करावा, तसेच पांढरा ड्रेस व बॅज परिधान करूनच रिक्षा चालवावी, असे आवाहन केले. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार सेवा देण्यावर त्यांनी भर दिला.
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गीतांजली काळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना रिक्षा चालकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. रिक्षा व्यवसायातील शिस्त, सुरक्षितता आणि प्रवाशांप्रती जबाबदारी याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिनेश अहिवळे, उमेश अहिवळे, हरिदास अहिवळे, फरांदे, जगताप यांच्यासह विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी चहापान व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. नव्या आरटीओ टीमच्या स्वागतामुळे प्रशासन व रिक्षा चालक संघटनांमधील समन्वय अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज