फलटण (प्रतिनिधी):
रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने पुण्यश्लोक महाराणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व मांगल्याच्या वातावरणात साजरी करण्यात आली. या दैदिप्यमान सोहळ्याचे औचित्य साधून फलटण शहर व परिसरातील विविध विद्यालयांमधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून गुणवंत मुला-मुलींचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत अनेक मान्यवर व सहकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक केले.
या विद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा झाला बहुमान:
या सोहळ्यात फलटणमधील अग्रगण्य शिक्षण संस्थांच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला, यामध्ये प्रामुख्याने:
फलटण एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण.
सौ. वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण.
जय भवानी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, तिरकवाडी (फलटण).
कुरेशी मोहल्ला येथील उर्दू स्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
इयत्ता दहावी: सत्कारमूर्ती व मान्यवर;
इयत्ता दहावीच्या वर्गातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खालील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला:
१) कु. सानिका रमेश सोनवलकर - सत्कारकर्ते: श्री. अप्पासाहेब कापसे व श्री. बजरंग गावडे.
२) कु. वैष्णवी राहुल शिंदे - सत्कारकर्ते: श्री. शंकरराव माडकर (माजी सभापती) व श्री. भानुदास सरक (संचालक, मालोजी बँक).
३) चि. साहिल नंदकुमार जाधव - सत्कारकर्ते: श्री. महादेव पोकळे (माजी जिल्हा परिषद सदस्य) व श्री. बापूराव गावडे (माजी पंचायत समिती सदस्य).
४) कु. श्रेया नितीन कदम - सत्कारकर्ते: श्री. संदीप चोरमले (नगरसेवक) व श्री. रमेश गावडे (प्रगतशील शेतकरी).
५) चि. गौरव सुनील धालवडे - सत्कारकर्ते: श्री. रामभाऊ ढेकळे (माजी सभापती) व श्री. भीमराव बुरुंगले सर.
६) कु. इरम अक्रम बेपारी - या विद्यार्थिनीचा उर्दू शाळेत प्रत्यक्ष जाऊन रणरागिणी संस्थेच्या संचालिका सौ. रझिया शेख, सचिव श्री. मारुती टकले व माजी प्राचार्या सौ. शाहीन शेख यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
इयत्ता बारावी: सत्कारमूर्ती व मान्यवर;इयत्ता बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या खालील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला:
१) कु. सृष्टी चंद्रकांत लोणकर - सत्कारकर्ते: डॉक्टर श्रुती विक्रांत थिटे व सौ. शाहीन इस्माईल शेख (माजी प्राचार्या).
२) कु. सुप्रिया संतोष आंधळे - सत्कारकर्ते: श्री. सांगळे अण्णा (पटकरी) व श्री. पोकळे.
३) कु. अंकिता सुरेश मसुगडे - सत्कारकर्ते: सौ. अयोध्या घोरपडे (पोलीस उपनिरीक्षक, फलटण) व सौ. रझिया शेख (संचालिका, रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था).
४) कु. श्रेया हिम्मत फरांदे - सत्कारकर्ते: श्री. भाऊसो कापसे व श्री. जाधव (नगरसेवक).
५) कु. संस्कृती विजय फरांदे - सत्कारकर्ते: श्री. भगवान लकडे (बिल्डर) व श्री. तुकाराम शिंदे (प्रगतशील बागायतदार).
६) कु. जोया मोसिन कुरेशी - या विद्यार्थिनीचा देखील उर्दू शाळेत जाऊन रणरागिणी संस्थेच्या संचालिका सौ. रझिया शेख, सचिव श्री. मारुती टकले व माजी प्राचार्या सौ. शाहीन शेख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी गुणवंतांचा केलेला हा सत्कार विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.



0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज