मुंबई| (प्रतिनिधी)दि.१२-:अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची नावे नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दि. २९ एप्रिल २०२६ रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवत नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
नव्या कार्यकारिणीतील पदाधिकारी पुढीलप्रमाणे :
🔹 सुनेत्रा अजित पवार — राष्ट्रीय अध्यक्षा
🔹 शिवाजीराव गरजे — खजिनदार (ऑडिट व अकाउंट्स)
🔹 पार्थ अजित पवार — सरचिटणीस (पक्ष समन्वय)
🔹 सुबोध मोहिते — सरचिटणीस (संघटनात्मक व प्रशासकीय कामकाज)
🔹 जय अजित पवार — राष्ट्रीय सचिव (राष्ट्रीय शिस्तपालन समिती / खजिनदार)
🔹 अविनाश आदिक — राष्ट्रीय सचिव (सहकार, आयटी, विज्ञान-तंत्रज्ञान, MSME, प्रशिक्षण)
🔹 सना मलिक — राष्ट्रीय सचिव (अल्पसंख्याक व महिला विभाग)
🔹 धीरज शर्मा — राष्ट्रीय युवक अध्यक्ष (युवा विभाग)
🔹 संजय प्रजापती — राष्ट्रीय सचिव (संघटनात्मक काम / सामाजिक सक्षमीकरण)
🔹 राणा रणवीर सिंह — राष्ट्रीय सचिव (SC/ST/OBC संघटना)
🔹 डॉ. रमन प्रीत सिंह — राष्ट्रीय सचिव (विद्यार्थी, युवा सक्षमीकरण, कौशल्य विकास, रोजगार, प्रशिक्षण)
🔹 धनंजय शर्मा — राष्ट्रीय सचिव (किसान सभा, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग विभाग)
🔹 डॉ. अभिषेक व्ही. बोकेय — राष्ट्रीय सचिव (क्रीडा व सांस्कृतिक विभाग)
या नव्या यादीमुळे पक्षात मोठे संघटनात्मक बदल सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, पक्षातील प्रभावशाली आणि अनुभवी नेत्यांना वगळण्यात आल्याने अंतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय वर्तुळात या निर्णयाकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने मोठ्या रणनीतीचा भाग म्हणून पाहिले जात आहे. अजित पवार गटात आता नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज