बारामती पोटनिवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी; राजकीय वातावरण तापलं


बारामती ,दि.१९-: विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात सध्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवार आपापली ताकद पणाला लावत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सभा, मेळावे, पदयात्रा आणि घरभेटींचा सपाटा लावला आहे.


सुनेत्रा पवार आणि करुणा मुंडे यांच्यात थेट सामना रंगला असून, दोन्ही बाजूंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून, प्रत्येक बूथवर संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक घेत स्थानिक पातळीवरील तयारीचा आढावा घेतला. त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर भर देण्याचे निर्देश दिले.


दुसरीकडे, विरोधकांकडूनही आक्रमक प्रचार सुरू असून, सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर जोरदार टीका केली जात आहे. सोशल मीडियावरही प्रचाराची चुरस वाढली असून, विविध व्हिडिओ, पोस्ट आणि प्रचार साहित्य व्हायरल होत आहे.


बारामतीची ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असल्याने राज्यातील दिग्गज नेत्यांचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. आगामी काही दिवसांत मोठ्या सभा आणि रोड शो होण्याची शक्यता असून, त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

बारामती तालुक्यातील विविध मुद्द्यांवरून करूणा मुंडे बोलत आहेत . 

 एकूणच, बारामतीत सध्या प्रचाराचा धुरळा उडाला असून, मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या