बारामती,दि.१९- : बारामती तालुक्यातील गायकवाड मळा सोकसवाडी येथून महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर उत्साहाचे वातावरण असताना, गायकवाड मळा येथील बौद्ध विकास तरुण मंडळाचे कार्यकर्ते आज सोलापूर येथे अभिवादन करण्यासाठी जल्लोषात रवाना झाले. “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला असून, तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र येत शिस्तबद्ध पद्धतीने सोलापूरकडे प्रस्थान केले. निळे झेंडे, डॉ. आंबेडकरांचे फोटो आणि घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. समाजातील विविध घटकांतील नागरिकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे आणि समता, बंधुता व न्याय या मूल्यांचा जागर करणे हेच या उपक्रमामागील मुख्य उद्दिष्ट आहे.
भीम जयंतीनिमित्त युवकांमध्ये निर्माण झालेली एकजूट आणि जागरूकता ही समाज परिवर्तनासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी रोहन गायकवाड ,योगेश गायकवाड ,अभयराज ,गायकवाड अभिजीत गायकवाड ,धनराज गायकवाड ,गौरव धाईंजे ,सागर भोसले ,आदित्य मोरे, अविनाश गायकवाड, अजय गायकवाड, अनिकेत गायकवाड, सौरभ गायकवाड, बाबू गायकवाड, विशाल गायकवाड, मयूर गायकवाड व इतर सहभागी झाले


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज