शिक्षणाची वारी आणि सन्मानाची शिदोरी! महादेव गायकवाड (आप्पा) यांच्याकडून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रविवार पेठेत भव्य कार्यक्रम संपन्न;

   फलटण:[प्रतिनिधी] दि.11 एप्रिल 2026,

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची १९९ वी जयंती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती या महामानवांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रविवार पेठ येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. 'कामगार संघर्ष संघटने'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव (आप्पा) गायकवाड आणि रविवार पेठ मित्र परिवार यांच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव;

कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिसरातील लहान मुला-मुलींसाठी शैक्षणिक व मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये संगीत खुर्ची आणि लिंबू-चमचा यांसारख्या खेळांनी मुलांमध्ये उत्साह भरला. तसेच, विद्यार्थ्यांनी महामानवांच्या जीवनावर आधारित भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली. सहभागी सर्व ७० ते ८० विद्यार्थी-विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला.

महिलांसाठी 'होम मिनिस्टर' खेळ!

परिसरातील महिलांसाठी खास 'होम मिनिस्टर' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे विजेते खालीलप्रमाणे:

प्रथम क्रमांक: मोनिका महादेव गायकवाड (साडी)

द्वितीय क्रमांक: तुलसी अक्षय मिसाळ (डिनर सेट)

तृतीय क्रमांक: अदिती दत्तात्रय मोरे (भिंतीवरील घड्याळ)

मान्यवरांचा महापुरुषांचे विचार देऊन सन्मान;

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांना 'निळी शाल', 'महापुरुषांचे चरित्र' आणि 'भारतीय संविधानाची उद्देशिका' देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रा. डॉ. बाळासाहेब कांबळे, श्री.रणधीर भोसले (मानवाधिकार संघटना), 'लोक ध्यास'चे संपादक श्री.राजकुमार काकडे, 'लोकशाही भारत'चे  श्री.संपादक सागर चव्हाण, श्री.प्रेम मोरे (BSP), श्री.सुहास काकडे, ॲड.  श्री.मनीष काकडे आणि डॅशिंग पत्रकार श्री. आप्पासाहेब तांबे (पोलीस क्राईम) या मान्यवरांचा समावेश होता.

गेल्या तीन वर्षांपासून जयंतीनिमित्त राबवले जाणारे हे उपक्रम त्यांच्या समाजकार्यातील चिकाटी आणि निष्ठेचे प्रतीक आहेत.समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणून उत्सव आणि सामाजिक बांधिलकी यांची योग्य सांगड घालण्याचे कसब त्यांच्या कार्यामध्ये दिसून येते.

   तसेच कामगार संघर्ष संघटनेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आप्पा गायकवाड सातत्याने करत आहेत.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन महादेव गायकवाड आप्पा आणि रविवार पेठ मित्र परिवाराच्या सदस्यांनी केले. महापुरुषांच्या विचारांचा वारसा जोपासणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.

 श्री.महादेव (आप्पा) गायकवाड, आपल्या अतुलनीय कार्याला आणि दातृत्वाला मनापासून सलाम! आपण समाजाचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ आहात...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या