अनिल वीर
सातारा,दि.१८- : जिल्हा काँग्रेसमध्ये फेरबदलाचे सूतोवाच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुंबई येथे पश्चिम महाराष्ट्राचे शिक्षक विभागाचे सरचिटणीस श्रीकांत कांबळे व माजी युवा प्रदेश सरचिटणीस मनीषा साळुंखे यांनी भेट घेऊन सातारा येथील पक्ष वाढीसाठी चर्चा करण्यात आली.
सातारा येथे लवकरच पक्षाचा भव्य मेळावा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्याचे ठरले आहे. त्याबाबतची घोषणा लवकरच जाहीर करण्यात येईल.असे चर्चेअंती ठरले.यावेळी जिल्ह्यातील शिक्षक विभाग, आरोग्य विभाग व महिला बचत गट व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी सातारा येथे मोठा फेरफार बदल करण्याचे सुचवले आहे. तसेच अनेक योजना सातारासाठी राबवणार आहे.असेही त्यांनी विविध उदाहरणाद्वारे सांगितले.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज