“परंपरा अबाधित! सोलापुरात भीमजयंतीची भव्य मिरवणूक 19 एप्रिललाच — भिमसैनिकांचा ठाम निर्धार”





सोलापूर,दि.२-: : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात निघणारी ऐतिहासिक मिरवणूक यंदाही जुन्या परंपरेनुसारच काढण्यात येणार असल्याचा ठाम निर्णय भिमसैनिकांनी जाहीर केला आहे. रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी ही भव्य मिरवणूक निघणार असून, कोणत्याही परिस्थितीत परंपरेत बदल होऊ दिला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.


सोलापुरात गेल्या अनेक वर्षांपासून 14 एप्रिलनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी भीमजयंतीची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व मराठवाड्यातील हजारो भीमसैनिक याच दिवशी सोलापुरात दाखल होत असतात. त्यामुळे ही परंपरा अबाधित ठेवण्यावर सर्वांचे एकमत झाले आहे.



या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. 3 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता न्यु बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सर्व भिमसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मिरवणुकीच्या नियोजनावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.


रविवारी मिरवणूक असल्यामुळे सर्व समाजघटकांना सहभाग घेणे सोयीचे होते


वाहतूक कोंडीचा ताण कमी राहतो, नागरिकांना गैरसोय टळते


शाळा-कॉलेजांना सुट्टी असल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात


बाहेरगावी असलेले भीमसैनिक सहज सहभागी होऊ शकतात


आरोग्यसेवेवरील ताण कमी असल्याने आपत्कालीन अडचणी कमी होतात


ही मिरवणूक कोणत्याही पक्षाची नसून स्वाभिमान आणि अस्मितेची प्रतीक आहे




परंपरेत बदल करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही


भिमसैनिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,

“ही मिरवणूक कोणत्याही राजकीय प्रयोगासाठी नाही; ती आमच्या रक्तातल्या भीमाची, स्वाभिमानाची आणि अभिमानाची ओळख आहे.”

या निर्णयावेळी आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे, दशरथ कसबे, पिंटू डावरे, रॉकी बंगाळे, नागेश इंगळे, सिद्धेश्वर पांडगळे, अजित बनसोड, सुहास सावंत, अजित गादेकर, सागर उबाळे, आशितोष नाटकर, लखन भंडारे, बाळासाहेब बनसोडे, विकी शेंडगे, बबन शिंदे, श्रीमंत जाधव, चंद्रकांत सोनवणे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


सोलापुरातील भीमजयंती मिरवणूक ही केवळ एक कार्यक्रम नसून ती लाखो अनुयायांच्या भावना आणि परंपरेशी जोडलेली आहे. त्यामुळे 19 एप्रिललाच मिरवणूक काढण्याचा निर्णय हा केवळ तारखेचा नसून अस्मितेचा प्रश्न बनला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या