नागपूर (प्रतिनिधी),दि .२३-: यांच्या नेतृत्वाखाली आज, सोमवार (दि. 23 मार्च 2026) रोजी येथे च्या वर संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झाले असून, शहरात आंदोलकांची लक्षणीय उपस्थिती दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे.
संभाव्य गर्दी व तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, वाहतूक व्यवस्थेतही आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.
दरम्यान, या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, पुढील घडामोडींवर प्रशासन आणि नागरिकांचे बारकाईने लक्ष आहे.
नागपूर शहराला पोलीस छावणीचे स्वरूप झाले असून लाखोंच्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दाखल होतील हा मोर्चा ऐतिहासिक होणार आहे. या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर काय मार्गदर्शन करतात यावर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले आहे.




0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज