डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा महाड येथे स्वागत समारंभ



महाड,दि.२१ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या वतीने महाड येथील ऐतिहासिक क्रांतीभूमी चवदार तळे येथे बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायांच्या स्वागतार्थ विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

हा स्वागत समारंभ अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, विद्यार्थी तसेच अनुयायी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या प्रसंगी समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या मूलभूत मूल्यांविषयीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.



क्रांतीभूमी महाड येथील चवदार तळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय व अस्पृश्यतेविरुद्ध उभारलेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाचे प्रतीक असून आजही ते मानवाधिकारांच्या लढ्याची प्रेरणा देत आहे.

या उत्कृष्ट आणि प्रभावी आयोजनाबद्दल आनंदराज आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या