महाडमध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कडक अंमलबजावणीसाठी मंत्री संजय शिरसाट यांना निवेदन; तात्काळ कारवाईचे आश्वासन



महाड,दि.२१- : मागासवर्गीयांवरील अत्याचार रोखण्यासाठी (ॲट्रॉसिटी ॲक्ट) याची कडक अंमलबजावणी तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांची भेट घेतली.

यावेळी १ ते १२ मुद्द्यांवर सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंत्री शिरसाट यांच्यासोबत चर्चा करत विविध प्रलंबित प्रश्न मांडले.

या चर्चेदरम्यान मंत्री संजय शिरसाट यांनी सर्व मुद्द्यांच्या अंमलबजावणीसाठी तात्काळ बैठक बोलावून संबंधित विभागांना आवश्यक आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिले.

या वेळी वैभव गीते, भाऊराव तायडे, संजय झेंडे, आजिनाथ राऊत, शिवाजी झोंबाडे, दत्ता कांबळे, सचिन झेंडे, गणेश गायकवाड, आप्पा गायकवाड, गोविंद मोरे, जय भय्या माने यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या