पुणे,दि.२१- : वादग्रस्त प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या संबंधित महिलेच्या समर्थनार्थ काही कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेकाचा प्रतीकात्मक कार्यक्रम राबवला. या कृतीमागे तिची प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात असलं, तरी या प्रकारामुळे उलट जनतेत संतापाची लाट उसळल्याचं चित्र आहे.
संबंधित प्रकरणातील गंभीर आरोपांमुळे आधीच वातावरण तापलेलं असताना अशा प्रकारच्या कृतींनी परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया देत “प्रतीकात्मक कार्यक्रमांपेक्षा आरोपांवर स्पष्ट भूमिका मांडावी” अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सत्यता काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अधिकृत यंत्रणांच्या चौकशीकडे जनतेचे डोळे लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात सत्य समोर येणार का, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज