अनिल वीर
सातारा ,दि.२१-: भारतीय संविधानाबाबत जनजागृती होणेकरिता घर घर संविधान या उपक्रमांतर्गत प्रबोधनात्मक भीमगीतांचा,बुलंद भिम सह्याद्रीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम बंधुत्व शाहिरीरत्न श्रीरंग रणदिवे व सहकारी यांनी सादर केला.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सांस्कृतिक भवन, नगरपरिषद चौक या ठिकाणी समाज कल्याण सहायक आयुक्त सुनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.शाहीर श्रीरंग रणदिवे यांना साथ देणारे तुकाराम गायकवाड,किशोर गायकवाड,तबलापट्टू दळवी,हार्मोनियम प्रवीण जाधव आदी संगीतसाज देणारे व कोरस उपस्थित होते.
सदरच्या कार्यक्रमास समता दूत विशाल कंबळे,शाहीर किरण जगताप,रमेश इंजे, प्राचार्य डॉ.अरुण गाडे,ट्रस्टी अरुण पोळ,सुहास मोरे,चंद्रकांत म्हस्के, बळीराम जाधव,निवृत्ती रोकडे, प्रिया पोटे,डॉ.आदिनाथ माळगे, वसंत गंगावणे,प्रभाकर बनसोडे, सतीश गाडे,संदीप कांबळे, प्रकाश सावंत,रामदास वाघमारे, गॉड गिफ्टचे रणदिवे, नागटीळक,अनिल वीर,बनसोडे, दिलीप फणसे,दिलीप सावंत,सतीश चव्हाण, उपासक-उपासिका आदी संविधानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज