नागपूर मोर्चासाठी टोलमाफी द्या!” — ‘वंचित’चा प्रशासनाला इशारा; अडवणूक झाल्यास परिणाम भोगावे लागतील



यवतमाळ ,दि.२१-: च्या वतीने २३ मार्च रोजी येथे आयोजित संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची धार आणखी तीव्र झाली आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्या वाहनांना टोलमाफी द्यावी, अशी ठाम मागणी ‘वंचित’ने प्रशासनाकडे केली असून, यासाठी यवतमाळमध्ये अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.

यवतमाळ पश्चिम जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर यांच्या नेतृत्वाखाली टोल प्रशासनाला हे निवेदन देण्यात आले. यांच्या नेतृत्वाखाली २३ मार्च २०२६ रोजी मुख्यालयावर हा भव्य मोर्चा निघणार असून, राज्यभरातून हजारो कार्यकर्ते नागपूरकडे रवाना होणार आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडजवळ तुळजापूर–नागपूर महामार्गावरील बिजोरा (ता. महागाव) टोल नाक्यावरून मोठ्या प्रमाणात वाहने जाणार असल्याने, या वाहनांकडून कोणताही टोल आकारू नये आणि कार्यकर्त्यांना अडवू नये, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.

🚨 इशारा स्पष्ट!
टोल नाक्यावर कार्यकर्त्यांना अडवण्याचा किंवा कोणतीही गैरसोय करण्याचा प्रयत्न झाल्यास परिस्थिती चिघळू शकते आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी टोल प्रशासनाची राहील, असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर महागाव तालुका अध्यक्ष अंकुश कोकरे, धम्मदीप काळबांडे, सयाजीराव कांबळे, अरविंद गरडे, धनंजय ढगे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

👉 एकूणच, नागपूर मोर्चा आधीच चर्चेत असताना आता टोलमाफीच्या मागणीमुळे वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या