मुखेड येथील सत्याग्रह स्मारकाचे काम त्वरित पूर्ण करा - महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे


नाशिक, दि. २४ : भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याचे समाज कल्याण आयुक्त श्री. देविदास नांदगावकर साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून वरील मागणीचे स्मरण करून दिले..

भिमटोला सामाजिक संघटना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष मुखेड ता.येवला जि.नाशिक येथील सत्याग्रही स्मारक दुरुस्त करून सुशोभीकरण करण्यासाठी अनेकदा निवेदने दिली आहेत तसेच येवला तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने आंदोलने ही करण्यात आली परंतु अद्याप पर्यंत समाज कल्याण विभागाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तसेच विभागामार्फत सांगितले गेले की मुखेड ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन या.. हा ठराव घेण्याचे काम समाजकल्याण चे असून सत्याग्रही स्मारकाचे काम त्वरित पूर्ण करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे..

याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, ज्येष्ठ साहित्यिक कवी पत्रकार रत्नदीपजी जाधव, सिन्नर तालुका कार्याध्यक्ष प्रवीण रणशेवरे, युवा नेते राहुलभाऊ जाधव, समाधान सोनवणे, गौरव पवार, सुनिल जयभावे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या