पणदरे ,१७-: नालंदा बुद्ध विहार, अशोकनगर, पणदरे यांच्या विद्यमाने वर्षावासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेचा शुभारंभ रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात झाला. यावेळी बौद्धाचार्य आयुष्यमान महेंद्र रघुनाथ गायकवाड यांनी ‘पंचशील’ या विषयावर मार्गदर्शन करत उपस्थित उपासक-उपासिकांना धम्मविषयक विचारांची सखोल माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुष्यमान राहुल सर गायकवाड यांनी केले. यावेळी वर्षावासाचे महत्त्व स्पष्ट करत शांतीलाल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सामूहिक बुद्धपूजेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमान महेंद्र गुलाब गायकवाड यांनी केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी धम्मगीते सादर करून कार्यक्रमात मंगलमय वातावरण निर्माण केले.
या कार्यक्रमास पणदरे पंचक्रोशीतील विविध सामाजिक व धम्म कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते अमित सोनवणे, भाऊ वानखेडे, घोरपडे बंधू, कांबळे बंधू यांच्यासह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मंगल प्रसंगी ‘वंचित बहुजन न्यूज’चे प्रमुख संपादक व प्रसिद्ध पत्रकार महेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे वार्तांकन केले.
२३ ऑगस्ट रोजी पुढील व्याख्यान
वर्षावास व्याख्यानमालेतील पुढील व्याख्यान रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरी पणदरे पंचक्रोशीतील सर्व उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्म व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज