सोनकसवाडीत भीम जयंती उत्साहात साजरी; संविधान उद्देशिका वाचनाने दिला सामाजिक एकतेचा संदेश






सोनकसवाडी (ता. बारामती),दि.१५- : ग्रामपंचायत सोनकसवाडी येथे महामानव, भारतरत्न व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून सामाजिक बांधिलकी व समतेचा संदेश देण्यात आला.




या कार्यक्रमास सरपंच सौ. राणी सतीश कोकरे, उपसरपंच सतीश घुले, ग्रामपंचायत सदस्य नितीन लोखंडे, गणपत कोकरे, कोमल रोहन गायकवाड, ग्रामसेवक विनायक गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश कोकरे यांच्यासह प्रगतशील शेतकरी सतीश कोकरे, रोहन गायकवाड, राजेंद्र कोकरे, अप्पा सुळ, नितीन कोकरे, सुनील जेधे, बापू सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, सोनकसवाडीतील गायकवाड मळा येथे बौद्ध विकास तरुण मंडळाच्या वतीने भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बौद्ध पूजा-पाठाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.




यावेळी बारामतीचे माजी आमदार व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाला प्रगतशील शेतकरी सतीश अण्णा कोकरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोकरे, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश कोकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच बौद्ध विकास मंडळाचे कार्यकर्ते  माजी सदस्य जनार्दन गायकवाड, प्रवीण गायकवाड, योगेश अमरसिंह गायकवाड, धनसिंग गायकवाड, प्रभाकर गायकवाड, विलास गायकवाड, अनिकेत गायकवाड, अभिजीत गायकवाड, अजय गायकवाड, दलित  पॅंथर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश गायकवाड, आशिष गायकवाड, आदित्य मोरे व इतर कार्यकर्ते   तसेच
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थांनी उपस्थित राहून भीम जयंती उत्साहात साजरी केली.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या