वंचित बहुजन आघाडीतर्फे सरकार विरोधार्थ सातारा येथे आंदोलन संपन्न



अनिल वीर

सातारा,दि.६- : वंचित बहुजन आघाडीतर्फे राज्यव्यापी आंदोलन ठिकठिकाणी आयोजीत केलेले होते.त्या पार्श्वभूमीवर सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकार विरोधी जिल्हा पूर्व व पश्चिम या दोन्ही विभागाच्यावतीने एकत्रित आंदोलन जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे (पूर्व) व ऍड.दयानंद माने (पश्चिम) यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले.

   राज्यव्यापी आंदोलनाचा भाग असून या आंदोलनामध्ये पक्षाचे जिल्हा, तालुका कमिटी, युवक आघाडी, महिला आघाडी आणि सर्व सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

    गॅस,पेट्रोल व डिझेलची टंचाई आशियाई युद्धमुळे वाढत आहेत.गॅस वेळेवर मिळत नाही. पेट्रोल, डिझेलचेही रेशनिंग झाले आहे. आतापर्यंत मिळत नसलेले व सरकारने बंदी घातलेले रॉकेल सरकारनेच बाजारात उपलब्ध केले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत. तरीही केंद्र सरकार आणि राज्य सरकार वरील सत्य मान्य करायला तयार नाही. उलट जनतेची दिशाभूल करीत आहेत.याचा जाब विचारणेसाठी आंदोलनाचे नियोजन महाराष्ट्र कमिटीने महाराष्ट्रभर केलेले आहे.या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग सातारा जिल्ह्याने सक्रियपणे होऊन सर्वसामान्य लोकांचे वेदनेला वाचा फोडली.मुजरा मोदीच्या देश विकण्याच्या आर्थिक नितिमुळे देशात ही परस्थिती निर्माण झाली आहे. महिला, गृहिणी, मधमावर्गीय आणि गरीब कुटुंबाना स्वयंपाकाच्या गॅसाठी तासंतास लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. गॅस सिलेंडरचा काळाबाजार चालू आहे.भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने या आंदोलनात कार्यकर्ते सामील होते.निषेधार्थ चूल मांडुनही आंदोलन छेडले.घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी नेते चंद्रकांत खंडाईत, जिल्हा महासचिव दादासाहेब केंगार,उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप,सुभाष गायकवाड, झेंले-पाटील, चित्राताई गायकवाड,गणेश कारंडे,ऍड. विलास वहागावकर जिल्हा,तालुका व शहर पदाधिकारी,असंख्य कार्यकर्ते, युवा जिल्हाध्यक्ष अमोल गंगावणे, महासचिव सायली भोसले आदी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या