अहाल्यानगर,दि.२३-: रहाता तालुका ,हरेगाव येथील पीडित मुलांच्या कुटुंबीयांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणातील पीडित मुलांमध्ये मराठा समाजातील एका मुलाचाही समावेश असल्याने, गावगुंडांच्या त्रासाला सर्वच जाती-धर्मातील लोकांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून, सुरुवातीपासूनच पीडित मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाने पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी नाना गलांडे हा अद्याप फरार आहे.
पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी रामदास आठवले यांच्याकडे भावना व्यक्त करत, फरार आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
या वेळी रिपाइं चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे, संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, विजय वाकचोरे, राजा कापसे, बाळासाहेब गायकवाड, भिमा बागूल, सुभाष त्रिभुवन, सुनील साळवे, पप्पू बनसोडे, दीपक गायकवाड, रमाताई धिवर, मनालीताई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज