नाशिक ,दि.२४-:शहरात मानवतेलाच काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली असून, ‘उपचार’ आणि ‘दैवी शक्ती’च्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या एका भोंदूबाबाचा विकृत चेहरा समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याने महिलांच्या भीतीचा आणि अडचणींचा गैरफायदा घेत, अत्यंत नीच पातळीवर जाऊन गुन्हे केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा भोंदूबाबा महिलांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी चक्क रिमोटवर चालणारा नकली साप आणि वाघाच्या कातड्याचा वापर करत होता. “दैवी शक्तींचा कोप होईल” अशी भीती दाखवत तो महिलांना पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढत होता.
👉 नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२५ दरम्यानचा प्रकार
एका विवाहित महिलेला कौटुंबिक अडचणींमुळे मानसिक आधाराची गरज असताना, खरातने तिच्याशी जवळीक वाढवली. “तुझ्या सर्व समस्या सोडवतो” असे आमिष दाखवत तिला अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवले.
यानंतर तिचं पहिलं लग्न मोडल्यानंतर, दुसरं लग्न लावून देण्याचं आमिष दाखवत तिला पुन्हा बोलावण्यात आलं. याच भेटीत तिला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.
👉 अत्याचारानंतर आणखी अमानुष कृत्य
या घटनेनंतर महिला गरोदर राहिल्याचं समजताच, स्वतःचा बचाव करण्यासाठी आरोपीने तिच्यावर दबाव टाकत सक्तीने गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
💥 पीडितेची धाडसी तक्रार – पोलिसांची तातडीची कारवाई
मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कोलमडलेल्या अवस्थेतही पीडित महिलेनं धैर्य दाखवत पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
🔎 SIT ची नियुक्ती – मोठं जाळं उघड होण्याची शक्यता
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) नेमलं आहे. प्राथमिक तपासातच संशय व्यक्त केला जात आहे की,
👉 हा भोंदू अशाच पद्धतीने अनेक महिलांना फसवत होता का?
👉 अजून किती पीडित महिला पुढे येणार?
⚠️ समाजासाठी मोठा इशारा
ही घटना केवळ एका व्यक्तीचा गुन्हा नसून, अंधश्रद्धा आणि भीतीच्या नावाखाली चालणाऱ्या फसवणुकीचं भयावह वास्तव समोर आणते.
👉 अशा भोंदूंपासून सावध रहा – अंधश्रद्धेला बळी पडू नका!

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज