शिरवळ पोलीस ठाण्याचे उत्कृष्ट पाऊल : दोन सराईत गुन्हेगारांची सातारा-पुणे जिल्ह्यातून तडीपार


 सातारा, दि. २६ :सातारा जिल्ह्यातील शिरवळ, खंडाळा आणि भुईंज पोलीस हद्दीत गुन्हे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सातारा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. हा निर्णय स्थानिक सुरक्षिततेसाठी एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

शिरवळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिद आणि पोलीस शिपाई अक्षय बगाड  यांनी हा आदेश अंमलात आणला. या कारवाईत अजिंक्य उर्फ पप्पु अलबत कांबळे (वय ३३, शिरवळ) आणि इम्रान कलाम काझी (वय ३८, शिरवळ) यांना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत सोडून देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग, श्री. विशाल खांबे, आणि शिरवळ पोलीस ठाण्याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या यशस्वी प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षिततेसाठी असे कठोर पाऊल अत्यंत आवश्यक होते, आणि स्थानिक नागरिकांसाठी हा एक मोठा दिलासा आहे. या कारवाईमुळे सातारा-पुणे भागातील गुन्हेगारीवर मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या