सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना सदिच्छा भेट


सातारा,दि.२२ : सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांनी आज जलमंदिर पॅलेस येथे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सौ. प्रियाताई शिंदे यांची अध्यक्षपदी तसेच श्री. राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यावेळी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या.


सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या नेतृत्वातून प्रभावी काम होईल, असा विश्वास व्यक्त करत जिल्ह्याच्या प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. साताऱ्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी सातारा लोकसभा महायुती समन्वयक श्री. सुनील काटकर, प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य श्री. काका धुमाळ, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री. मदनभाऊ काळभोर, श्री. अजित साळुंखे, श्री. राजाभाऊ जगदाळे, पंचायत समिती सदस्य श्री. वसंतराव भंडारे, नगरसेवक श्री. शंकर माळवदे, श्री. पंकज चव्हाण, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. यशवंत ढाणे बापू, माजी नगरसेवक श्री. किशोर शिंदे, श्री. नासीर शेख, ॲड. अंकुश जाधव, ॲड. विनीत पाटील, श्री. सुशांत निंबाळकर, श्री. मनीष शेठ महाडवाले, श्री. तेजस जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या