फलटण शहरातील मलटण भागात 'मे. एच. डी. लाटकर गॅस एजन्सी'चा मनमानी कारभार समोर आला आहे. ज्या ग्राहकांचे घरपोच वितरणाचे ओटीपी (OTP) आले आहेत, त्यांना घरी गॅस न देता एका विशिष्ट ठिकाणी बोलावून भर उन्हात रांगेत उभे केले जात आहे. विशेष म्हणजे, भररस्त्यात अशा प्रकारे गॅस सिलिंडरचे वाटप करणे हे सुरक्षेच्या दृष्टीनेही घातक आहे.
या सर्व प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, "फलटण तहसील कार्यालय या एजन्सीवर एवढे मेहरबान का?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. घरपोच सेवा देण्यासाठी शासन नियमानुसार चार्ज आकारला जात असतानाही ग्राहकांना स्वतःहून सिलिंडर नेण्यासाठी का भाग पाडले जात आहे? याकडे पुरवठा विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे इराक - इराण युद्धाच्या नावाखाली फलटण मधील गॅस एजन्सी मनमानी कारभार करत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकार मात्र स्पष्टपणे सांगत आहे की गॅसचा तुटवडा नाही पण या संधीचा गैरफायदा घेत फलटणमधील अनेक गॅस एजन्सी मनमानी करत आहेत, जगामधील युद्ध आता संपले आहे पण फलटण शहरातील गॅस एजन्सी चे युद्ध कधी संपेल?? यांना कोण समज देईल? हे आगामी काळात पहावे लागेल.
या संदर्भात संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत असून, आता तरी तहसील प्रशासन या एजन्सीवर कठोर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज